Coffee आणि बरचं काही☕

Drink coffee read book & Be happy

ब्लॉगवर आपले स्वागत आहे .ब्लॉग लिहायला आणि ब्लॉगवरील लिखाण वाचायला खूप आवडतं ,
मनातलं साचलेलं कल्पकतेने भरून आलेलं सर्व काही इथे मांडण्याचा
प्रयत्न करते आहे .. आशा आहे माझं लिखाण तुम्हाला नक्कीच आवडेल ...

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९  सायंकाळची वेळ माणसाची नसतेच रहस्यमय ओढयात बंधिस्त करून घ्यायला खोल खोल दरीत भू मातेच्या शोधात भटकणारा हा देह न थकता महासागरी प्रवासाच्या दिशेने झुकलेला असतो . भूगर्भ त्या दिवशी खवळलेल्या लाटांशी एकजूट होऊन मला ओढत खोल खोल दरीत ढकलू पाहत होता अंगातलं सर्व त्राण एकटवून मी बाहेर निघण्याच्या प्रयत्नात होती . त्या खवळनाऱ्या लाटा मला ओढुन घेणाऱ्या असफल ठरावयात असचं काही झालं . बाहेरचा परिसर नजरेच्या दृष्टीक्षेपात पडला आकाश निरभ्र होतं . सूर्य क्षितिजाच्या पल्याड जाऊन मला हसतं असावा असा भास झाला त्याची आणि माझी गट्टी न हरणाऱ्या भावनिक ओढीची होती . पण आता लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी सडा पाडला होता . दोन हाताने लाटाना मागे सारत southern च्या किनाऱ्यावर येऊन हात लांब केला दोन किनारी गोवलेल्या खडकाच्या आधारे वर आली .. गिटो नेहमी सारखंच आजही त्याचे दोन्ही हात मला कवेत घ्याला मोकळे करून उभा होता . त्याला आलिंगन देत मी विचारणा केली ..

“ गिटो , ह्या महासागराच्या प्रवासात तुला कधी काही गवसलं का ? “ 
गिटो माझ्याकडे नजर रोखून बोलू लागला  .... “ यस माय चाईल्ड , जगण्याचे धडे मला ह्या महासागराकडून मिळाले . “
मला त्याच्या कडून अपेक्षित असलेल्या उत्तराच्या हव्यासात मी होते . हा मला काय सांगतो जगण्याचे धडे ह्या जलांतरीत महासागरकडून मिळावे मी जरा अवाक होऊन विचारले ..” गिटो ते कसं काय ? “  
 “ तुला सांगू एकदा काय झालं ? “
“ हं ...”
“ नावाडयाने मला नाव चालवायला दिली मी चौदा वर्षाचा असेलं तेव्हा .. “
“ मग ..”
“ मग काय ? मला नाव चालवण्याची शैली अवगत नव्हतीच तरीही वाट नेईल तिकडे मी सैरवैर हा आस्मंत धुंडाळू लागलो . वादळाने अचानक तीव्र रूप धारण केले नाव घेऊन मी कोणत्या बांधावर येऊन पोहचलो हे माझ्याच ध्यानात नव्हते नाव मला ढासळू लागली .  लाटा खवळू लागल्या लाटाचा शिरकाव माझ्या तोंडापर्यंत पाणी उसळून फेकत होत्या . नाव डामलडोल होऊ लागली . स्ट्रेनजर माझ्याजवळ नव्हताच मी त्या नावेवर मोठ मोठ्याने विलाप करू लागलो कोणी तरी वाचवा मला वाचवा . माझ्या मदतीसाठी माझ्या बचावासाठी साक्षात जेसु सुद्धा येणारं नव्हता . नावेने मला पाण्यात ढकलले नाव लाटाच्या वेगात तरंगत होती मी नावेला पकडून उठण्याच्या प्रयत्नात होतो तोच लाटा मला घेरत होत्या एक मोठी लाट आली आणि त्या लाटेने मला दूर फेकले नावेपासून खूप दूर . पाण्याच्या तुडुंब भरलेल्या त्या महासागरात माझ्या डोळ्यात पाण्याचा प्रचंड डोह साचला होता . काय करू मी तेव्हा विचार करण्यापेक्षा कृती करून बाहेर पडणे हितकर होते . “
 एवढ्यात मी ओरडून गिटोला म्हटले , “ बापरे  गिटो , पण तूच तर माझा स्विमिंग मास्टर आहे आणि तुझ्यावर ही वेळ आली होती मग तू बाहेर कसा पडला ?? “
ह्यावर गिटो आपल्या दोन्ही हातानी मला खुणावत सांगत होता . “ त्या वेळेनेच मला स्विमिंग मास्टर बनवलं ,  कधी पोहणे न जाणारा मी दोन हात दोन पाय शाबूत आहे म्हणून जोर जोराने त्या लाटाच्या तावडीतून हेलकावे देत पोहू लागलो तेव्हापासून माझ्यात एक वेगळीच उर्मी संचारली . कोणत्याच शिकवणीचा आधार न घेता मी स्वतः एक स्विमिंग मास्टर झालो . आणि तुला माहिती आहे मी त्या मध्यरात्री जग धुंडाळत महासागराच्या दुनियेतून बाहेर  कुठे येऊन पोहचलो होतो ?? “
प्रश्नार्थक नजरेने मी गिटो कडे बघत , “ कुठे ... कुठे येऊन पोहचला होतास गिटो तू ? “
समोर असलेल्या वोडकावर नजर खिळवत गिटो  उद्गारला , “ लुसिआ  तो तुझ्यासमोर असलेला वोडका बघतेय southern  ऑसेन च्या ह्याच दक्षिणी किनारपटीवर येऊन मी  मोकळा सुटकारा घेतला . “   
 ओह्ह्ह तर म्हणून तुला जगण्याचे धडे ह्या महासागराने  दिले . असं म्हणतच मी गिटो चा निरोप घेतला . गिटो चा सहवास त्याच्या प्रेरणा देणारा संवाद माझ्या मनाला मोहून घेत असला तरी माझी जन्मदात्री घरी माझी वाट बघत दाराजवळ उभी असते वाटेकडे टकलाऊन ...
  तसं गिटो माझा स्विम मास्टर पण तो मला स्वतः च्या लेकी सारखा जपतो अलबतचं  माय स्वीट चाईल्ड म्हणून कुरवाळतो . कधी त्याला मी त्याच्या परिवाराबद्ल विचारयला गेली तर तो विषय टाळण्याचा प्रयत्न करतो आजपर्यंत गिटो ने जगातल्या सर्व रहस्यमय ताकदीची न उलगडणाऱ्या कोड्यात डोकून पाहण्याची मला भरभरून हुरूप दिली . त्याचं वय तो मला बरोबर सत्तर वर्ष असल्याचं सांगतो पण कधी त्याचा जन्मदिन असतो हे सांगत नाही . माझ्या जन्म दिनी मात्र मला नवनवीन भेट वस्तू तो मोठ्या कर्तबगारीने देत राहाला ... सत्तरी ओलांडलेला गिटो मात्र आजही मला मनाने नवतरुण वाटतो कारण ती धम्मक मी त्याच्यात पाहिली आहे अजून आपल्याला खूप काही करायचं असल्याचं त्याच्या डोळ्यातल चैतन्य मला माझा नव्याने जन्म झाल्याचे डोहाळे लावतात . जसा साप कात टाकल्यावर नवं रूप नाही पण नवा जन्म धारण करतो तसचं गिटो च्या बोलण्याने मी भारवून जाते .
  आजपर्यंत मी आणि माझी लाडकी मैत्रीण मार्टिना म्हणजे माझी सर्वस्व ह्या विश्वातली सौख्य देन  माझी मॉम ... ह्या रक्ताच्या दोन नात्यापैकी तिसरे नाते कधी अनुभवलेच नाही . मॉम म्हणायची मला रक्ताचाभाऊ आहे माझ्यापेक्ष्या चार वर्ष मोठा असलेला पण तो अजून काही मला साक्ष्यात भेटलेला नाही . त्याच्या भेटीसाठी मी आतुर आहे त्याचं प्रेम नको मला त्याचे खांद्यावर धीर देणारे हात नकोय पण मला कोणी भाऊ आहे ह्याच कल्पनेने माझ मन भरून येतं  .. तो कुठे असेलं आता ? कसा दिसत असेलं दिसायला तो मार्टिनामॉम सारखा असेलं की ? मॉम मला त्याच्या बदल कधीच काही सांगत का नाही सांगत ?? ह्यावर मी तिला खुपदा विचारून तिच्या निरागस चेहऱ्यावर एक चिंतातूर स्पर्श करून गेलेली छटा बघून हा प्रश्न तिला कधी विचारायचाच नाही म्हणून ह्या नात्याच्या भावविश्वातून स्वतःला दूर सारते .... एकदा मला अडगडित एक फोटो फ्रेम दिसली ती फ्रेम घेऊन मी मॉम जवळ गेली तिला विचारणा करू लागली , “ मॉम  , हा फ्रेम मधला माझा भाऊच आहेना ! आणि ही त्याच्या कडेवर असलेली मी तो किती प्रेम करायचा न ग मझ्यावर किती सुंदर वाटते ही फ्रेम ... नाही ?? “  हे शब्द ऐकताच मॉमने माझ्या हातून ती फ्रेम हिसकावली आणि मला म्हणाली , “ हो हा तुझा भाऊच आहे जॉन पण तू ही फ्रेम ....” ह्या समोर काहीच न बोलता ती ते फ्रेम घेऊन तिथून निघून गेली . जॉन हे नावं फक्त मी  ध्यानात ठेवत जॉन नावाच्या मिळेल त्या माझ्या पेक्ष्या वयाने चार वर्ष मोठ्या असलेल्या तरुणाशी मैत्री करून तो माझा भाऊ आहे का हे जाणण्याचा प्रयत्न करीत होती . पण अजून पर्यंत माझ्या संपर्कात दोन जॉन येऊन गेलेत ते माझे कोणी असणे शक्यचं नाही . त्यांना पूर्ण परिवार आहे . जॉनचा शोध अद्यापही घेणे सुरूच होते ..
   आज घरी पोहचायला मला नऊ वाजलेत मार्टिनामॉम माझी वाट बघत बसली होती . माझ्या पायाचा आवाज येताच ती बाहेर आली .
“ बेटा किती वेळ ? चल लवकर आत ये मी आज तुझ्या आवडीची डिश बनवली . “
आत शिरताच चिकन फ्राय चा  खमंग घरभर दरवळत होता . हातपाय धुवून मी चिकनफ्राय वर ताव मारला . मॉमच्या हातच चिकन फ्राय खाण्यात काही वेगळाच स्वाद असतो . मी जेवण होताच अंथरुणावर लवडली .
 त्रानलेल्या देहाला रात्री झोप कशी लागली मला कळलच नाही . मॉम सकाळीच स्कूल मध्ये निघून गेली . म्याक्स्न माझी वर्ग मैत्रीण तिचा फोन वाजत होता . कधीची फोन करत असावी ती मी फोन उचलताच तिने मला सुखद धकका दिला .
“ हे माय च्याम्प तू तुझी पदवी पूर्ण केलीस तू पदवी पास झाली ...”
“ ओह्ह म्याक्सन मी तुझी खूप आभारी आहे , खूप खूप धन्यवाद तू झाली ना पास ? “
“ हो हो मी पण पदवी पास झाली , येत्या रविवारला ज्याकसन जूरेन सोबत माझं लग्न ठरल्य तू येशील नक्की . “
“ अरे एवढ्या लवकर लग्न करते ? “
“ तुला माहितीये न लुसिआ ,  मॉम त्यांना माझं शिक्षण अमान्य आहे . “
पदवीचा निकाल पास होण्याचा आनंद काही औरच असतो पण तो कुणाजवळ व्यक्त करणार मॉम ती तर पहाटे आवराआवर करून लवकर घरून निघून जाते . बर्गर खाऊन  मी चर्च मध्ये निघून गेली तिथे जाऊन माझं सर्व सुखं दुख मी गिटार वाजवण्यात संगीताच्या मंत्रमुग्ध दुनियेत जाते . आज आनंद व्यक्त करायला माझ्या हातात गिटार आणि सुरांची ताल छेडायला स्वर होते .
Acoustic guitar माझ्या हातात होता बोट ताल छेडत होते . मी माझ्या दुनियेत हरवून गात होते . चर्च मध्ये रम्य शांतात वास करत होती . एवढ्यात एक नवतरुण माझ्या बाजूला जेसू च्या समोर उभा राहून माझं गायन एकाग्रतेने ऐकत होता . त्याच्याकडे लक्ष जाताच मी थबकली . त्याच्या नजरेवर नजर पडताच माझी बोटं गिटारवरून सुटली .

“ थांबली का ? खूप छान गाते तुझा सूर म्हणजे येशूने तुला दिलेलं गोड गिफ्ट आहे .... गा ना !“ मला खरतर कोणी ऐकत आहे ह्याचं भानच नव्हत माझ्या संगीताची वहा वा ! करणारा तो पहिलाच व्यक्ती जीवनात भेटला . अनोळखी व्यक्ती सोबत मी काय बोलावं म्हणून मी त्याला टाळण्याचा प्रयत्न केला . “ सॉरी मिस्टर मला एकांतात गायला आवडतं  .. “ त्याच्या चेहऱ्यावर माझ्या बोलण्याने तीळ मात्र नाराजी नव्हती पसरली . तो मला ओके म्हणून तिथून निघून गेला  .. मला जरा ओशाल्यासारखं वाटलं मी त्या अनोळखी व्यक्तीला दुखवल तर नाही ना ! त्याला क्षमा मागायला मी चर्चच्या  बाहेर पाय ठेवला पण तो दूरवर मला कुठेच दिसत नव्हता .
 मी घरी गेले सांयकाळ होत आली म्हणून मी स्विमिंगसाठी जायला निघाले . दार उघडतच तर मॉम माझ्यासमोर उभी तिला घट्ट आलिंगन देत मी पदवी पास झाल्याचे सांगितले . तिच्या चेहऱ्यावर तो आनंद ओसडून वहात होता तिने मला आज सरावाला न जाण्याची विनंती केली . पण माझ्यासाठी सराव खूप महत्वाची बाब होती  . तिला आज मी लवकर येईल हे सांगून  घराच्या बाहेर पडली ..
  किनारपट्टीवर जाताच मी गिटोला सर्व दूर शोधू लागली . गिटो मला कुठेच दिसत नव्हता तिथे असलेल्या एका कोळ्याला मी विचारलं , “ गिटो ला कुठे पाहिलंत का ? तो माझ्याकडे बघत मला म्हणाला , “ हो गिटोचा मुलगा आला आहे तो आज येणारं नाही तो कालच मला बोलला . “
“ ओह्ह्ह पण गिटोने मला असं काही सांगितलं नाही , गिटो च्या परिवारात आणखी कोण कोण सदस्य आहेत तुम्हाला माहिती आहे ?? “
“ गिटोला त्याच्या मुलाशिवाय कोणीच नाही ह्या जगात त्याचा मुलगाही परदेशात शिकायला होता तो तीन , चार वर्षांनी त्याला भेटायला येत असतो . “
“ ओके , मी सरावाला निघते मला वेळ होत आहे . “ त्याचा निरोप घेत मी महासागराच्या खडकावर येऊन उभी होतं सागराला निरखून बघू लागली . आज मला जीवन म्हणजे ह्या महासागराच्या भरती ओहटी सारखं वाटायला लागलं . स्वीमवेअर परिधान करीत खडकावरून मी महासागरात उडी मारली . सूर्य तांबूस होतं क्षितिजाच्या पल्याड मावळत होता पक्षी निरभ्र काळसर अवकाशातून उडताना दिसत होते मी तेवढ्याच जोमात पोहायला सुरवात केली आज मला खूप खोल वर खूप खूप दूर जायचं होतं एकतासात मी आठकिलोमीटर दुरिच्या वेगाने खूप लांब निघून गेली दक्षिणी महासागराला मागे टाकत . खोल भूगर्भात मी पोहत जात होती खोल खोल दरीत निरनिराळ्या पानखुटी वनस्पतीची नव्याने ओळख होतं होती . एवढ्यात मला मागून पायाला थंड स्पर्श झालेला जाणवला मी माझ्या पोहण्याची दिशा बदलवत मागे वळली ते भयाण रूप बघून मी चित्कारलीच श्वास घेण्याचा वेग वाढला जोराने हार्टबीट होतं होत्या माझ्या समोर देवमाशाचं पिल्लू होतं . ते मला काही करेल म्हणून मी भीत होती . पण तो शांत कसलीही हालचाल ओढाताण न करता तसाच एखाद्या स्टयाचू प्रमाणे माझ्याकडे सारखा बघत होता त्याने त्याच्या शेपटीनी मला समोर जाण्यापासून  रोखले मी समोर जाण्याचा प्रयत्न करू लागली तो हालचाल करते का म्हणून बघू लागली मला समोर जाताना बघून तो माझा मागोवा घेत येऊ लागला तो आता माझ्या अगदी बाजूला येऊन मी ज्या दिशेला वळन घेईल तसा वळू लागला ...  त्याच्या हालचालीकडे त्याच्या शरीरयष्टीकडे बघून मला पुरती खात्री पटली हे देवमाश्याच नुकतच एक महिन्याचं पिल्लू आहे . मी त्याला जाणून घेण्याच्या प्रयत्नात होती तो तोंडानी फुत्कार्त मला काही सांगू पाहत होता पण मला त्याची भाषा कळेना मी ही त्याला हेच विचारण्याच्या प्रयत्नात होती . “ देवमाश्या तू तुझ्या आई पासून हरवला आहे का ? तू कोणत्या दिशेने इकडे आला तुझी आई कुठे असेलं आता आपण तिला शोधूयात का ?  “ इत्यादी प्रश्न ... त्याला आणि मला संवाद साधता आला असता तर कदाचित त्याच्या आईला शोधनही सोपं गेलं असतं . आमच्याकडे देवमाश्याच्या प्रजातीला लार्वे म्हणतात . लार्वे हे खूप चपळ असतात म्हणून त्या पिलाची आईही त्याला शोध घेत असेलच ह्यात तीळ मात्र शंका नव्हती . लार्वे माझ्या सोबत पोहत होता त्याच्या सोबतीला तेवढ्या मोठ्या जलाशयात जलचर प्राणी सोडले तर माझ्याविना कोणीच नव्हत . मी काय करावं म्हणून काही मिनिटासाठी थांबली देवमासा माझ्या पायथ्याशी कसाबसा चाचपडत होता .  मी मागे परतण्याच्या प्रयत्नात दिशा बदलवली देवमासा मला सोडायला तयार नव्हताच मी  किनाऱ्याच्या दिशेने वोडका शोधत पोहू लागली किनाऱ्याजवळ जाऊन कोणत्या नावाड्याला मला विचारायचं होतं तुम्ही देवमाशाची टोळी बघितली का ? वादळ विरुद्ध दिशेने येत होतं लाटा खवळत होत्या देवमासा भीत होता त्याला माझ्यासोबत आता पोहता येणे शक्य नव्हत . तो प्रयत्न करीत स्वतःला माझ्या सोबत जायचं म्हणून रेटत होता त्याला माझ्या सोबत भीती नव्हती म्हणून तो माझ्या मागेमागे येत होता त्याला आशा होती मी त्याच्या आईला नक्कीच शोधून काढणार ही . मी त्या खवळनाऱ्या लाटांचा प्रतिकार करत होती  . लाटा अजून तीव्र वेग धारण करीत होत्या . एक उंच लाट आली आणि तिने लार्वेला माझ्यापासून खूप दूर नेऊन फेकले मी लार्वेच्या दिशेने जायला सुरवात केली तर त्या लाटा मला मागे ओढत होत्या एक लाट उसळत खूप तीव्र तांडव धारण करून चक्री वादळा सारखी घुटमळत होती त्या लाटेनेच मला ओढुन घेतले त्या लाटेत मी सतत दहा मिनिटे गोल गोल चक्रावत राहिली . त्या लाटेने मला लार्वे पासून एक किलोमीटर दूर अंतरावर नेऊन फेकले . लाटा उसळतच होत्या . ह्या लाटेनेच लार्वे आणि माझी ताटातूट केली . लार्वे मला शोधत होता का कुणास ठाऊक ? मी दूरवरून लार्वेला माझ्याजवळ येताना बघत होती . तो एवढा वेळ पोहत मला शोधत मझ्या जवळ येत होता . मी बाळमाश्याला सांगत होती आपण नक्की शोधून काढू तुझ्या आईला कितीही वेळ झाला तरी तू फक्त माझी सोबत सोडू नको . उसळत्या लाटाचा सामना करत आम्ही आता वोडकाच्या अगदी जवळ होतो दोन किलोमीटर दुरिच्या अंतरावरून वोडका माझ्या नजरेला खुणावत होता बाळमासा थकलेला दिसत होता त्याच्यात पोहण्याचा त्राण उरलेला नसावा . आता मी वेग धारण केला बाळमासा हळूहळू पोहत येत होता माझी नजर समोर खडकाच्या दिशेने होती मी समोर पोहण्याचा वेग धारण करत लार्वे माझ्या मागे आहे का हे बघत होती . किनाऱ्याच्या जवळ येताच मी नावाड्याला ओरडून ओरडून जवळ बोलवण्याचा प्रयत्न करीत होती . माझ्या आवाजाचा वेध घेत माझ्या जवळ आले मी त्यांना विचारले , “ तुम्ही देवमाश्याचा कळप सागरी प्रवाहाने जाताना कुठे बघितलं काय ? “ तेव्हा नावडी म्हणाले , “ नाही नाही मी तर नाही बघितलं पण आताच मी कुणाच्या तरी तोंडून ऐकलं southern च्या उत्तरेस एक दहा , पंधरा देवमाश्याचा कळप आला आहे . “ मी त्यांचे बोलणे ऐकून मोठ्या आशेने मागे वळली .. ह्याचा अर्थ देवमाश्याची आईही त्याचा शोध घेत होती . मी देवमाश्याच्या जवळ जाताच तो थबकला तो खूप दमलेला मला भासत होता त्याला भूक लागली असावी का ? तो काय खाऊन जगत असेलं बर ! तो त्याच्या आईवर अवलंबून राहत असेलं तर आता त्याचं कस्स होणार तो समोर पोहू शकणार की नाही ह्याचं काळजीने माझं मन बधीर झालं . देवमाश्या चल आपल्याला तुझी आई भेटणार आहे आपण लवकर तिच्या पर्यंत पोहचू असा धीर देत मी त्याचं सागरी प्रवाहाने उतरेकडे निघाली . दहा वाजले होते उत्तरेची सीमा गाठत आम्ही पोहत येऊन एवढ्या दूरवर मला देव माश्याचा कळप कुठेच दिसतं नव्हता .  देव माश्याने मात्र आता वेग धारण केला होता तो माझ्या विरुद्ध दिशेने पोहत जाऊ लागला त्याच्या मागोमाग मी जणू त्याला त्याची आई आवाज देऊन जवळ बोलवत होती . पाण्याच्या ल्हीरीतून त्यांचा संवाद होतं असेलं का ?   होत असावा म्हणूनच देवमासा माझ्या विरुद्ध दिशेने पोहू लागला होता मी पोहत त्याच्यापर्यंत गेली पण तो आता थांबलेला होता . काय झालं लार्वे चल ना समोर असा थांबू नको तुझ्या आईला शोधायचं ना आपल्याला ? त्याच्या पाठीवर हात फिरवत मी मनातच बोलू लागली . तो चित्कारत होता जागेवर पंख हलवत होता पण समोर जात नव्हता मला काही कळेना ह्याला काय झालं असावं . माझ्या डोळ्यासमोर आता दूरवरून माश्यांचा कळप दृष्टिस पडत होता पाण्याचा खळखळाट करत देवमाश्याचा कळप आमच्या समोर दहा फुटावर येऊन थांबलेला होता त्यातून एक मासा देवमाश्या जवळ येत होता मी दूर होतं होती पण लार्वे सारखा माझ्याकडे डोकावत होता . लार्वेची आईजवळ येताच तो त्याच्या आईकडे बघून काहीतरी त्याच्या भाषेत सांगत होता . आता मला पक्की खात्री पटली होती लार्वेला त्याची आई मिळाली होती आणि हिच त्याची आई होती . एका हरवलेल्या देवमाश्याला त्याची आई मिळाली होती .  मी माझा दक्षिण महासागर सोडून लार्वेसाठी दिशा बदलवली होती आता मला आधी उत्तरेचा किनारा गाठायचा होता मी मागे परतीच्या मार्गावर जायला आरूढ झाली तेव्हा माझ्या मागे संपूर्ण देवमाश्याचा कळप होता आणि माझ्या बाजूला लार्वे ... लार्वे आधीच खूप थकलेला होता पण त्याची आई त्याला मिळाली म्हणून तो त्याचं जोशात माझ्यासोबत येत आसवा ते माझ्या सोबत कुठवर येणारं हे मलाही ठाऊक नव्हते . मी उत्तरेच्या किनाऱ्यावर येऊन पोहचली खडकाला हातधरून किनाऱ्यावर पाय ठेवला तेव्हा तो देव माश्यांचा कळप मला सार करताना दिसत होता मी किनाऱ्याच्या मधोमध येऊन मागे वळून बघितल्यावर मला देवमाश्याचा कळप ज्या दिशेने आम्ही त्याच्या शोधार्थात गेलो त्याचं दिशेने परतताना दिसला . ते दृश्य मी माझ्या नजरेत कैद करून ठेवलं खरचं आज मला ह्या महासागराने कधी नव्हे ते अनोख गिफ्ट दिलं ... एका हरवलेला पाडसाला त्याचं मातृत्व भेटावं ह्या सारखी जगात आनंदायी सुखद गोष्ट दुसरी कोणती असू शकते ...

         बस गतिरोधकावरून पार होत होती उंच माळरानावरून क्षितिजाच्या पल्याडं गेलेला सुर्य अंधाराला आश्वासन देण्यास  तत्पर झालेला होता .पक्षी किलबिलाट करतं आपल्या खोप्याकडे रवाना होत होते .पण तो मात्र धुर्याच्या एका कडेला नांगर लावून चितातूर होऊन बसलेला .सम्दं शिवार स्मशानातल्या शांततेसारखं भकास वाटत होते .अंधाराने विळखा घातला सूर्य मावळतीला गेला.बैलाने हंबरडा फोडला त्या आवाजाने गण्याला जाग आली .बैलाला जोरखंडाने बांधत नांगर शेताच्या गोठ्यात ठेवून गण्या वाटेने निघाला .वाटेत येवढ्यात त्याला घरा शेजारचा राम्या दिसला .

राम्या .....अररर ऐ राम्या ........राम्या थांब ...थांब की र जरा ....असं ओरडत गण्याचा चा आवाजाने राम्या थांबला .
" का रे तु पण रात केली व्हयं आज घराकडं निघाले ?"
  " हो ,राम्या आज सम्दं वावर नागरून झालं उद्या बहिणीले पहायले पावणं येत हाय घरी मले रहावं लागनं म्हणलं."
"वह्य वह्य !....बरं हाय राह्य की घरी उद्याच्या दिस."
घरी अठाराविशे दारीद्र्य त्यात उपवर झालेली बहिण तिच्या लग्नासाठी गण्यान स्वतः च शिक्षण सोडून शहरात लहान मोठं काम केले पैसा जमविला . गण्याचा आणि त्यांच्या बहिणीच्या शिक्षणासाठी त्याच्या वडिलाने सावकाराकडून कर्ज काढलेल .थकता काळ पैशाची चनचन घरात भास्त होती घरातली सर्व जबाबदारी गण्याच्या एकट्यावर येऊन पडली .परिस्थितिला न डगमगता गण्या समोरे जात होता एकदा बहिणीच लग्न झालं की आपण शहरात निघून जायचं .छोटी मोठी नोकरी बघायची आणि वडिलानी काढलेल्या कर्जाची परतफेड करून मोकळ वहायचं पण शेतीची जबाबदारी पेलन त्याच्याने व्हायचं नाही .म्हणून बाप लेकात खट्टके उडायचे .रोज तो शेतात जाताना घरून वाद घालून निघायचा आहे तेवढ्या पैशात हुंडा आणि लग्नाचा सामा करून घ्या शेत विकून टाका असं सांगायचा .वडिलाना त्याचं असं वागनं पटायचं नाही .शेती विकणे म्हणजे स्वतः च अस्तित्व संपवण्यासारखं त्यांना वाटायचं.
  आजही गण्या असाचं वाद घालून गेला आणि येताना ही तोच राग मनात ठेवून रागाने तणतणत असा घरी आला . घरची भेगाळलेली उदासी त्यांच्या मनात झिरपत गेली;तापल्या भुईच्या पोटात भेगातून उन्हाच्या धारा जाव्यात तशी .
रडता रडता ती बोलत होती .दूरवर गावदेवळातून घंटा घुमत ऐकायला यावी ,तसे तिचे आवाज होते .
"जो तो लाखा च्या खाली उतरत नाही ,कशाला लगीन नावाच्या समाज मान्य संकल्पनेत मला अडकवता माय बापाचा कष्टाचं असा पैशाचा बोहला चढवून मंडपात नवरी होण्यापेक्षा बिनलग्नाचं रहायलेलं बरं !"
हे शब्द विजे सारखे तप्त शिशे कानात ओतत असल्याचं गण्याला वाटलं .मुंग्यांच्या वारूळाने भरून गेलेलं मस्तक जसं विचारणे त्यांच्या डोक्यात काहूर माजलं ...
तो दारातून एकत होता हे वर्षाला समजताच तिने तोडाचा पट्टा थांबवला .गण्या बहिणीला समजवतं होता आपण शेतकर्यांची पोरं हेच आपलं चुकलं तरी हिंमत नाही हारायची लग्न होऊन राहिनं हुंडा किती ही लागू देतं .
   घरात खायला ज्वारीची भाकरी आणि तिखटं मिटाच्या चटणी शिवाय दुसरं अन् त्यांच्या नशीबात नव्हते .रात्री पोटात अन्नचे कन टाकत सारे आपल्या बिछाण्यावर गेले पण जो तो आपल्या विचारात जागून रात्र काढत होता .शेंवताबाई गण्याची आई आणि वर्षा झोपी गेल्या दिनकरावाना आणि गण्याला काही केल्या झोप येईना .
   दिवस उजाडला सुर्य नारायणाने पिवळसर चांदर भु वर ओढत सर्वाना जाग आणून दिली .त्या दिवशी वर्षाला बघायला पावणे आले .वर्षा म्हणजे दिसायला गोरीपान लांब सडक केस हरिणीसारखे चपळ डोळे गुलाबाच्या  पाकळ्यानसारखे गुलाबी ओठ हसताना गालावर खळी  पडली की सारा आस्मतं तिच्या सोबत हसत असल्याचा भास होई .सौदर्यांची जणू देवता ती अशा सौज्वळ मुलीला कोण पंसद नाही करणारा पण पावणा हुंड्यासाठी ठ्यरायचा नाही .वर्षा बीए पास आणि आज चांगल स्थळ चालून घरी आलं होतं मुलगा इंजीनियर होता .चांगल्या नोकरी वर पण तो दिडलाख हुंडा मागत होता .जेवढा मुलगा जास्त शिकून आणि नोकरीवर तेवढी त्यांची हुंड्याची किंमत जास्त ही आजच्या वास्तविक परिस्थितिची शोकनिय दाभिक्ता झाली आहे .आपली मुलगी सुखात रहावी असं प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असते वर्षा चा आईबाबाला ही ते स्थळ योग्य वाटलं .गणेश नेही पन्नास हजाराची कुठून तरी जुळवणूक करू असे सांगितले  .
     गणेश शेतात राबराब राबत होता .आजपर्यत संपुर्ण जमवलेला त्याचा पैसा बहिणीच्या लग्नावर खर्च होणार होता ह्याचे त्याला अजिबात दुख नव्हते पण एकलाख असून पन्नास हजार आणखीनच कमी पडतात .काय करावं त्याला सुचेना दोन दिवसानंतर घरात पावना जमा होईल तेव्हापर्यत पैसा त्यांच्या पर्यत दिला पाहिजे नाहीतर लग्न मोडून आपल्या बहिणीच्या नशीबी लोकांचीच दुश्ने लागतील असं होऊ द्यायच नाही ह्या भीतीने तो शहरात जायचं आणि एखाद्या मित्राला मागयचं पैस म्हणून तो भल्या उन्हाच्या टाईमालाच घरी बैल घेऊन जातो .
    शेंवताबाईला तो बाहेर खुट्याला बैल बांधताना बघून त्या आश्चार्यानं म्हणतात ," काय रं पोरा असा दिसढळाच्या पहिलचं का आला वावरातून निघून?"
"माय ,मले शहरात जायचं हाय आजच निघतो घटका भर्यानं..."
"का रे !शहरात काहिले चालला दोन दिवसान लग्न हायनं घरात ठाव नाह्य का ?"
" हो ,माय पण हुंड्याचा बनदोबस्त झाला नाय तं तुले ते लोक काय करतीलं माहिती न्हाय मी पैसा आनतो कुणाकडून उसना मागून ."
"बरं जा अन् जमलं तर उद्याच ये लय टायम नको लाऊ ."
"होय ,मी येतो ."
असं म्हणून गण्या घरातून बाहेर पडतो .दोन चार मित्राला नातंलगाना भेटतो पण कोणीच पैसे द्याला तयार नसतात .दोन दिवसान लग्न आहे घरात काय करावं त्याला समजत नव्हते .तो हाताची घडी घालून बसलेला होता बसटॉप वर तिथे समोरच त्याला मोठे हॉस्पिटल दिसले .त्याला वाटले आता आपल्या जवळ फक्त एकच पर्याय तो आहे आपली किडनी विकून पैसे मिळतील .तो उठतो त्या हॉस्पिटल मध्ये जाऊन डॉक्टरांसोबत संपर्क साधतो .एक किडनी विकून तो ती रक्कम घेऊन बस पकडतो आणि गावाला रवाना होतो .त्याला पैसे भेटल्याच समाधान वाटते पण ही गोष्ट कुणाला कळता कामा नये म्हणून तो विचार करू लागतो घरी बापाने विचारले एवढे पैसे कोणी दिले तर त्यांना आपण काय सांगावे .विचाराच्या तद्रीत गाव येऊन जाते .घरी गेल्यावर गण्याचे वडील शेंवताबाई वर्षा सर्व उदासीन चेहर्यांन चित्तेत बसले रहाते .
गण्या घरी जाऊन बसताच .त्यांची आई त्याला विचारते .
"पोरा काय करावं पैस्याच काही जुळलं का रे ??"
"हो ,माय"
त्यांने हो म्हणाताच वर्षांचा चेहरा आनंदाने फुलतो तिला वाटते आपला भाऊ म्हणजे आपल्यासाठी जीवाचं रान करणारा आणि कष्टानं स्वतः च पोट भरतं स्वतः चा स्वाभिमान गहान न ठेवता परिस्थिति समोर हतबल होऊन न जाता झुंझ देणारा आहे .
  पण दिनकररावाना प्रश्न पडतो ह्यानी एवढी मोठी रक्कम आणली कठून .
"गण्या ,लेका अररेरे ऐवढे पैसे तू आणले कुठून ??"
"बाबा ,शहरात मी जिथं पहिलं काम करायचो तिच्या मालकानं दिले ."
हे ऐकून दिनकररावाचे कान सुखावले पण त्यांना पोराने किडनी विकून स्वतः ची पैसे आणले ह्याची जान नव्हती .मुळात गण्यानेही ह्या गोष्टीपासून त्यांचा बाबाला अंधारातच ठेवले . त्याने ते पैसे तिकडल्या मंडळीना बोलवून त्यांच्या स्वाधीने केले .
       दोन दिवसाने लग्न शांततेने आणि आनंदाने पार पडले .पण गण्याचं अख्ख घर तरीही चित्ततेत असायचं .आता घर खायला धावायचं लग्न होऊन पंधरा दिवस झाले पोरीचा संसार तिकडे सुखाने सुरू झाला .पण इकडे तिच्या शेतकरी वडिलांची विदारीकता तिला ठाव नव्हती घरात ज्वारीला पैसा नव्हता .किडनी काढल्याने गण्यालाही शेतातली कामे करणे अवघड जायचे तो शेतात राबून आधीच खगून गेला होता .दिनकरावच्या नजरेने दिसत नव्हते .एकटी शेंवताबाई काय करणार . दिनकरावावर आधीच कर्जाचा डोंगर उभा होता तो कसा फिटणार . करता सरता गण्या ही आता खाटेला खिळला होता ज्वराने त्याला ग्रारासले होते .
  काय करावं म्हणून शेंवताबाई आणि दिनकराव अशाही परिस्थित शेतात जायचे . सरकारही शेतकर्यावर उपकारासारखा कर्ज माफीचा डाव खेळत असतो वस्तुचे भाव वाढवत महागाईचा उद्रेक तेवढा व्हावा म्हणने पुरे होते .
     दोन झाडे उंच आभाळाकडे वर मानेने बघत ताठ उभी होती .त्या झाडाकडे आणि हातात असलेल्या दोराकडे बघतं .दिनकररावाने शेंवताबाईला आवाज दिला .
"शेंवते .....एएएए शेंवते ......मी का म्हणतो ."
"अअअं....बोला ,का???"
"का करू वं जगून असं रह्यलं बी का आपल्या पासी जगण्यासाठी आता ,
"लेकीच लग्न झालं लेकाले शिवारं विकाच ह्यय म्हणे कर्जाचा बोझ कव्हा फेडू सवकारासनी तर जगनं आपलं ईकत घेतलं .मी म्हणतो हा दोर घे आणि झाडाले लटकून संपवू स्वतः ले."
"काय बी वं इचार आणता राव मनातनं,पर तुम्ही म्हणता तै बी खरं हाय् "
"तसचं करू असं मुठीत जीव धरून पोटाले पीळ देत भाकरी साठी मरमर करत बसण्यास तै मरण सस्त हाय मायासनी."
दोन उभ्या असलेल्या झाडाला दोर गळ्यात बांधून शेंवताबाई आणि दिनकरराव आयुष्याची घडी संपवतात .
     तिकडे भुकेने व्याकूळ होतं गण्या मायची वाट बघतो त्यांच्या खाटेजवळ माय येईल आणि चार घास त्याला भरवेल म्हणून त्यांचा मनाला मायेची ओढ लागते .
   दोन जीवाना असं झाडाला लटकलेलं बघून निसर्गं ही तो हळहळला ..झाडांच्या फांद्यांतली पाखरं कर्कश ओरडू लागली ,कावळ्याची कावकाव भयाण दाटली .आभाळाकडे झेप घेऊन सुर्यास्ताच्या अर्तंदर्शी घरट्याकडे विहार करणार्या पक्षानी ही कलकलाट केला .कल्लोळाने परिसर सारा दणकून उठला .
       भुकेसाठी गण्या तळमळतच राहिला शरीरातला क्षीण सारा विस्तारला .मध्यरात्री सैरावैरा नजरेने मायबापाला शोधतं त्याचं वावर शिवारात येऊन त्यानेही प्राण त्यागला .....


मुखवटे हजार रंगाचे पाहीले 
ह्या माणुसकीच्या गर्दीत 
स्वार्थानेच सारे ओझे वाहिले
ह्या माणुसकीच्या गर्दीत ...
कधी कळस पेटला उच्भ्रू शौकितांचा ;
कधी फास लागला अन्यायाचा 
कळलेच नाही आम्हाला न्याय का असतो ??
गुन्हेगारीत सारा देश जळतो ..
कधी नवस फिटला का गरिबीचा ??
पोटातल्या भुकेने मात्र डंख मारला 
उपासमारीचा , कळवळत सारं काळीज 
उद्रेक झाला नीतिमूल्याचा खारीज ..
चिमणीच्या उजेडात प्रकाश शोधतं 
रातमायेनं विळखा घातला अंधाराचा ,
पावलोपावली साथ देणाऱ्या सावल्या 
ही झाल्या साऱ्या निष्ठुर माणुसकीच्या 
गर्दीत चेहरेच झाले आसूड ....
माणुसकीच्या गर्दीत
चेहरेच झाले आसूड !!

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

असं नाही की प्रत्येक कविता
जमेलच आणि टाळ्यांच्या
गजरात आपल्या नादमाधुर्याने
गाजेलच ....
स्वरांच्या सहजगत्या
भावनेतून उमटलेली
प्रत्येक ओळ आणि ओळ
काही ना काही सांगून जाईलच ,
असं नाही की प्रत्येक कविता
जमेलच ...
जन्माची शोकव्यथा
मरणाची कथा
भाबवल्या अस्तित्वाची
गर्भजळीत झाक झोकेलच
अस नाही की प्रत्येक कविता
जमेलच ...
मुक्या अंतःकरणात
दडलेल्या शब्दाला
वाचा फोडेलच ,
लपलेलं सत्य फुलेलंच
मृन्मयी धूळ पुसत नग्नता
क्षितिजे पांघरेलच
असं नाही की प्रत्येक कविता
जमेलच ....


रविवार, १० फेब्रुवारी, २०१९


ज्योती पुजारी यांनी लिहिलेली "शेवटाचा आरंभ' ही बलात्कार या विषयावर मंथन करणारी कादंबरी अंधारवाटेवरच्या सख्यांना दिलासा देणारी आहे. धैर्यानं पुन्हा उभे होऊन नव्या आशेनं जगण्याचा मंत्र देणारी आहे. निर्भया प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्याहीपूर्वी अरुणा शानभाग, हेतल पारेख, नयना पुजारी, रमिझाबी, मनोरमा कांबळे, माया त्यागी या केसेसनी जनमानस ढवळून काढलं होतं. अशा देशभरात घडलेल्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या महत्त्वपूर्ण केसेसचा या पुस्तकात सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. अशा घटनांची तीव्रता या कादंबरीतल्या कथानकातून वाचकाच्या मनाला भिडत जाते आणि या गैरप्रवृत्तींविरुद्ध उभं राहणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे याचं भान आणून देते
बलात्कार झाल्यावर स्त्री एकटी संपत नाही, तर संपूर्ण कुटुंब उद्‌ध्वस्त होतं. अनेक स्त्रियांची बलात्कारानंतर हत्या होते किंवा शारीरिक वेदना होऊन त्यांचा मृत्यू होतो; पण ज्या जगतात त्यांच्यासाठीही जिवंत जाणिवा वाहणं सोपं नसतं. अशांसाठी या पुस्तकातून संदेश दिला गेला आहे, की बलात्कार हा आयुष्याचा शेवट नसतो. बलात्कार हा क्रूर अपघात आहे. बलात्कारारासारखे अपघात हे फार निष्ठूर आहेत; पण तरीही ते शेवट ठरता कामा नयेत. या कादंबरीच्या निमित्तानं आपल्या देशातल्या स्त्री-सुरक्षाविषयक कायदे, स्त्रीच्या अधिकारांशी निगडित कायदे, त्रुटी यांचीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. परंतु, त्याच वेळी त्यातल्या त्रुटी, त्यात आवश्‍यक बदल, नव्या कायद्यांची गरज यांबाबतही चर्चा आहे. बलात्काराशी संबंधित महत्त्वाच्या घटनांची नोंद यात आहे. विशेषत: समाजमन ढवळून काढणाऱ्या, संघटित करणाऱ्या आणि जनरेट्यापुढे कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागली, नव्या सरकारी समित्या स्थापन झाल्या, राज्यसभेत, लोकसभेत महिला सुरक्षा या विषयावर विधेयकं मांडली गेली, अशा घटनांचा महत्त्वाचा दस्तावेज या पुस्तकाच्या निमित्तानं नोंदवण्यात आला आहे.
ज्योती पुजारी या चाकोरीबाहेरचे विषय घेऊन लेखन करणाऱ्या लेखिका. समकालीन वास्तवाचा वेध घेत, प्रश्‍नाच्या मुळाशी जाणं, त्यावर वैचारिक चर्चा करणं, त्यावरच्या उपायांचा सर्वांगानं वेध घेणं आणि वाचकांची या समस्यांशी नाळ जोडून त्यांच्या कर्तव्यांचं भान करून देणं हे काम त्या सहजगत्या करत आहेत. खरं तर लेखणीद्वारे केलेली ही एक समाजसेवाच आहे.
बलात्कारच नव्हे, तर सर्व प्रकारच्या लैंगिक विकृतींकडं या पुस्तकाच्या निमित्तानं लक्ष वेधलं गेलं आहे. शरीर, मन, भावना, कुटुंब या सगळ्यांवर होणारे नंतरचे भीषण परिणाम, या घटनांमागच्या, कारणांची मीमांसा, विशेषत: मूल्यऱ्हास, सांस्कृतिक आदर्शवादांचा ऱ्हास, माणसाच्या आत्मकेंद्री प्रकृतीनं वाढलेला चंगळवाद आणि त्यातून जन्माला आलेले हे विकृत अपराध याकडंही लक्ष वेधण्यात आलं आहे. नव्या पिढीला वर्तणुकीची दिशा दाखवण्याचं कामही यातून झालेलं आहे. अंधारात बसलेल्या तरुणीला प्रकाशवाट दाखवणारं मुखपृष्ठ सूचक आहे. प्रकाशवाट दाखवणाऱ्या या महत्त्वपूर्ण पुस्तकाचं स्वागत मराठी साहित्यात नक्कीच केलं जाईल.
पुस्तकाचं नाव : शेवटाचा आरंभ
लेखिका : ज्योती पुजारी
प्रकाशक विद्या बुक्‍स पब्लिशर्स, औरंगाबाद (0240-2337371)
पानं : 192, किंमत : 250 रुपये

सादर 
दिनांक :- 10 फेब्रुवारी 2019 च्या सकाळ सप्तरंग पुरवणीतून .
लेखिका :- मनीषा अतुल 

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

दैवी शक्तीच्या आहारी जाऊन माणसाने स्वतःची बुद्धीतर गहाण ठेवलीच पण , आकाशातले ग्रह तारे ह्याचा माणसाच्या संसारीक
जीवनाशी तीळ मात्र सबंध नसताना ते कुंडलीत कसे प्रवेश करतात हेच मला कळतं नाही . राशी ग्रह , जन्म कुंडली , राशी देवता ह्या साऱ्याचा प्रभाव माणसावर पडतंच नाही जशी निसर्गानी मानवाची निर्मिती केली . तशीच निर्मिती सर्व नैसर्गिक घटकांची
झाली आपण त्याकडे निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे हे समजून न बघता आध्यत्मिक कल्पना करतं बसने किती
मूर्खपणाचे लक्षण आहेत हे समजून येईलच .

माणूस एखाद्या गुरु किंवा ढोंगी बाबाच्या आहारी जाऊन उलट स्वतःच नुकसान कसा करून घेतो हे मला माझ्या वैक्तिक जीवनात
बघितलेल्या उधारणावरून स्पष्ट करावे लागेल .
अनिता जवळ जवळ तीस वर्षाची झाली . अनिता शिकतं राहिली आणि लग्नाचं वय वाढतं गेलं . पावना घरात ठरायचं नाही लग्न जुळायचं नावं नाही म्हणून अनिताच्या आईला शेजारच्या एका स्त्रीने फुकटचा सल्ला दिला .
अनिताची आई तुम्ही देवळात जा म्हणे तिथे रिद्धी- सिद्धी प्राप्त झालेले बाबा बसले असतात ते नक्कीच तुम्हाला लग्न जुळण्यासाठी
उपाय सांगतील ते करा . अनिताच्या आईनेही त्या स्त्रीच म्हणणं ऐकलं . अनिता तिच्याजवळ तर देवळातल्या बाबांजवळ जाण्यावाचून दुसरा काही पर्याय नव्हता . एक दिवस दोघीही मायलेकी देवळातल्या बाबांजवळ गेल्या . देवळातल्या बाबाने आधी तिचा हाथ बघितला त्यांचं हाथ बघणं हे प्रथम कार्य असतं मग हळूहळू थोतांडपणची सुरु होतं असते . त्यांनी हाथबघून तिला सुचवलं , " अनिता आपल्या हातात लग्न रेशा सुकळ समृद्ध आहे . लग्न आज ना उद्या होईलच पण तुमच्या नाव राशीत दोष आढळतो मला तुमची कुंडली आणून दाखवा म्हणजे काय करायचं ह्यावर मी तुम्हाला तोडगा सांगतो . " ह्या आधी अनिताची कधी जन्म कुंडली बनवून नव्हती . नव्याने कुंडली बनवून त्या बाबांसमोर नेऊन ठेवल्यास त्यांनी अनिताच्या राशीत दोष सांगितला . ते म्हणाले , " तुमच्या राशीत शनी ग्रह आहे , राहूची तुमच्यावर साया आहे . त्याला शांत करावे लागेल नाही केल्यास तुमचं लग्न जुळणं अशक्य आहे . तुम्हाला सहा महिने शनीची शांती करा लागेल त्यासाठी दर शनिवारला कुणाची दृष्ट तुमच्यावर न पडता केळीच्या झाडाची फांदी आणून दर शनिवारी नवीन नारळ आणून एका तांब्याच्या कलशावर पूजा मांडायची . पूजा पूर्ण झाल्यास ती पूजा नदी पात्रात शिरवून द्यायची आणि शनिवारीच इथे मंदिरात एरंडीच तेल दिव्यात आणून टाकायचं "
बाबाने सांगितलेलं हे नियम तिने करण्याचा प्रयत्न केला . दर शनिवारला ती कुणाची नजर आपल्यावर केळीच्या फांद्या तोडताना पडू नये म्हणून पहाटे पाच वाजता उठायची . सहा महिने तिने सतत बाबाने सांगितलेल्या उपाययोजना केल्या . पण लग्न जुळायचं नाव नाही . आणि बाबाने हे उपाय सांगायच्या आधीच राशी ग्रह कुडंलीतले दोष बघायचे तिच्याकडून सहा हजार घेतले . आता सात महिन्याने ती पुन्हा बाबाकडे गेली एवढे उपाय करून अजून माझं लग्न कसं नाही जुडलं हे विचारायला . तर बाबाने तिचा हात कुंडली बघून सांगितलं तुमच्या राशीत शनी आणि राहुला तुम्ही शांत केलं पण आता मंगळ ग्रहाने प्रवेश केला . पोरी तुझ्यावर साडेसातीच चक्र राशीत सुरु झालं ही एक खूप मोठी अडचण आहे . साडेसाती सुरु झाल्यावर सात वर्ष आता तुझं लग्न होणे शक्य नाही . तेव्हा न राहून अनिता बाबाला विचारते बाबा ह्यावर कोणताच उपाय नाही का तुम्ही रिद्धी- सिद्धी प्राप्त आहात म्हणून मी माझं लग्न जुळेल ह्या आशेनं तुमच्याकडे आली तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे . तेव्हा बाबाने तिला घरात होम करून तिच्या नावाची पूजा घेण्यात येईल ते ती स्वतः घेतील असे सांगितले ह्या होममध्ये जाळण्यात येणाऱ्या सामग्री वीस हजाराच्या आणि पाच महाराजना जेवण देण्यात यावं असं त्यांनी तिला सांगितलं हे सर्व केल्यास तेव्हा तिचं लग्न जुळेलच ह्याची शाशवती त्यांनी दिली नाही . ह्यावरून अनिताच्या लक्षात आले हे बाबा पैशानी सामान्य जनतेला असेच लुटतात ह्याच्या नादी लागून आपण फसलो ह्याची जाणीव होताच ती त्या बाबाच्या उपाययोजनापासून सावध झाली . परंत तिने त्या बाबाच्या मंदिराचा उंबरठा ओलांडला नाही . बाबानी तिला हे उपाय केल्याशिवाय सात वर्ष तुझं लग्न होने शक्य नाही असेही सांगितले होते पण तिचं त्याचं महिन्यात लग्न जुडलं आता तिच्या लग्नाला तीन वर्ष होतील अनिता एका लेकराची आईही आहे . ह्यावरून माणसातला अंधविश्वास दिसून येतो
आणि अश्या बाबा महाराजच्या आहारी जाऊन सुशिक्षितांनी स्वतः वर ओढवून आणलेलं संकट , पैशाचा चुरडा वेळेचा झालेला दुरुपयोग
आणि बाबाच्या कचाट्यात सापडल्यावर एकदाची तिथून सुटका होणे कठीण ते तुम्हाला बरबाद करूनच सोडतील हे सत्य नाकारता येणार नाही .... म्हणून सतर्क राहा भोंदू बाबांपासून सावध व्हा ! शनी आला राहू गेला अन मंगळाने घात केला असं होऊ देऊ नका ..

शनिवार, २६ जानेवारी, २०१९

सोशल मीडियाचा अतिरेकी वापर
आजकाल लग्नाच्या पत्रिकाही व्हाट्सअप्पच्या माध्यमाने पोहचू लागल्या
जग दूरच एवढं जवळ आलं की फेसबुकच्या माध्यमाने अनोळखी व्यक्ती
सोबत मैत्री करून आपण त्यांच्या भुलथापाचा बळीचा बकरा झालो .
आज दहावीत शिकणारा मुलांपासून ते गृहिणी पर्यत आपला जास्तीत जास्त
वेळ मोबाईल मध्ये घालवतात . 
सकाळी उठल्या उठल्या आपण ब्रश हातात न घेता मोबाइल हातात घेतो
कुणाचे किती msg आलेत . कोणी काय पाठवलं  . इतरांचे स्टेटस बघण्यापर्यंत आपला पूर्ण अर्धा तास आपण व्यर्थ घालवतो .
आपल्याला ह्या वर्तुअल जगाने घेरलेले असते .
महत्वाचं काहीच नसते आपण समजतो कॉलेजचे ग्रुप आहेत पण
तिथे स्टडी वर कमी चर्चा आणि इतर विषयावर गप्पा करण्यात आपण
मश्गुल होऊन जातो .
तुमचं हे जग कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड ह्यावरच चालतं नवीन काही नाही त्यात तेच ते .
काय शिकता ह्यातून तुम्ही ? काहीच नाही . नेलपॅक असे पर्यंत तुमचं हे नातं असतं नेटपॅक संपला की तुमच्या नात्याची वॅलीडिटी ही संपली .
मग एकटेपणा खायला लागतो तुम्हाला तुम्ही ह्या जगाच्या दूर जाऊ शकत नाही .  चॅटिंग करणं msg फॉरवर्ड करणं . कोणी स्टेटस वर काय टाकलं कोणी कोणती पोस्ट टाकली कोणाच्या आपल्या पोस्टवर किती
कॉमेंट्स आल्या बस्स पुरेपूरे ...... वैताग नाही का येत कधी ह्याचा
असा प्रश उपस्थित होतो .
घरी असतांनाही आपण आपल्या कुटूंबाला वेळ देऊ शकत नाही .
पोरग कॉलेज ला गेलं आता एवढीच आईबाबांना समज घालून गप्प
राहावं लागतं .
कोंडमारा होतो इथे एका क्लिक बटनेवर जीवनाची सारी ससेहोलपट होते .
आपण आपली लाईफ सोशल मीडियाविना नाही का चांगली जगू शकतं ?
आपल्या जगण्याला  हेच एक माध्यम आहे का ?
असे प्रश विचारले कधी स्वतःला ? नाही ...
ह्यातून बाहेर पडायला वेळ मिळेल तेव्हा जाऊन विचारू ना !
तर ह्यातून बाहेर पडा ...
सर्वात आधी तुमच्या मोबाईल मधून व्हाट्सएप आणि फेसबुक सारखे एप डिलीट करा .
नंतरचा काही ट्रिकस तुम्ही अंमलात आणा .
हे नियम 21 दिवस करा आणि तुम्हीच तुमच्या आयुष्यात काय बद्दल घडतो ते बघा .
नियम तुमच्यासाठी
1) शक्य तो सकाळी 5ला उठण्याचा प्रयत्न करा .
2) बाहेर पडून खुल्या आकाशात थोड्या अंधारलेल्या आसमंतात चमकणाऱ्या चांदण्याना बघा . गारव्याला डोळे बंद करून अनुभवा .
तुम्हाला आयुष्यात काय बनायचं आहे काय हवं आहे ते मागा . ते मिळालं आहे ते तुमच्या पुढ्यात आहे असं स्वतः ला वाटू द्या ! हे जोपर्यत मिळतं
नाही तोपर्यंत रोज करा . पण एका अटीवर तुम्हाला त्यातून आनंद प्राप्त झाला पाहिजे . ( Visualisation process )
3) फ्रेश व्हा सकाळच्या विधी आटोपा .
4) तुम्ही विद्यार्थी असल्यास अभ्यासाला बसा . अभ्यास नसल्यास
फिरून या !
5) रोज तुमचा सातत्याने 8 ,10 तास अभ्यास नसेल होत तर
21 दिवस टाइम टेबल करून 4ला अभ्यासाला बसा आणि बघा
तुम्हाला रोज त्या वेळे वर without alarm जाग येईल . आणि अभ्यासाचा कंटाळा येणार नाही .
6 ) रोज काही न काही नवीन ज्ञान संग्रहित करण्याचा प्रयत्न करा . रोज
वर्तमानपत्र वाचा . शिकण्यासारखं काहीच नसेल तर इंग्लिश बोलायचं शिका . इंग्लिश ट्रान्सलेशन शिका . आयुष्यात तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल . ते ही कंटाळवने वाटत असेल तर gk वाचा .
7) शक्य तो मोबाइल चा डाटा ऑफ ठेवा . सतत मोबाइलकडे लक्ष घालू नका . व्हाट्सएप , फेसबुक हे अप डिलीट केल्यावर तुमचं मोबाईलकडे आधी सारख लक्ष ही जाणारं नाही .
8) रोज डायरी लिहा . आज काय केलं  , काय झालं हे तारखे निषद डायरीत लिहून ठेवा .
9) दिवसभर घरी असलं काही काम नसलं तरी दुपारी झोपायचं टाळा .
स्वतःला कशात ना कशात गुंतवून ठेवा . तुम्हाला जगणं सोपं वाटायला लागेल . उदास वाटल्यास आपला बहुतांश वेळ कुटुंबासोबत घालवा
नवीन संकल्पनाचा विचार करा .  निसर्गाच्या सानिध्यात रहा .
10 ) रात्री 10 पर्यत झोपायचं ठरवा .
सोशल मीडिया गरज आहे .
आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं असेल .  व्हाट्सएप शिवाय होऊ शकतं नाही . महत्वाचे ऑफिशिअल ग्रुप असतात . फाईल सेंड करायचा असतात .
स्टुडंट म्हणतील आम्हाला कॉलेजचे नोट्स शेअर करायचे असतात .
व्हाट्सएप कसं डिलीट करून चालेल ??
त्यासाठी तुमच्या प्रत्येकाच्या फोन मध्ये ई-मेल ac असते .
इथून तुम्हाला प्रत्येक documents शेअर करता येतात .
सोशल मीडियामुळे होणारे दुष्परिणाम
1) सर्वात घातक जास्तवेळ स्मार्टफोनचा वापर केल्याने
तुमची समरणशक्ती आठवण्याची क्षमता कमी होते .
2) चिडचिडेपणाची वृत्ती निर्माण होते . व्हाट्सएप फेसबूक इतर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणे आणि रात्री उशिरापर्यंत जागे असणे सकाळी झोपून उशिरा उठणे .  ह्यामुळे तुमच्या जगणे विचलित झालेलं असते .
3 ) योगा , पुस्तक वाचणे ह्याचे प्रमाण नाहीसे होते .
4) कुटुंबातील सदस्यांकडे दुर्लक्ष .
5) आयुष्यात जे साध्य करण्यासाठी आपण धडपडतो त्यांच्या पर्यत पोहचू शकतं नाही .
6) डोळ्यांवर मोबाईल स्क्रीनचा दुष्परिणाम होतो .
7 ) मेंदूची ग्रहणशक्ती कमी होऊन होऊन विसराळू वृत्ती उत्तेजित होते .
तुम्हाला काय वाटतं ??
तुम्हाला काय वाटतं . वरील बाबीचा विचार करा .  आयुष्य खूप
सुंदर आहे . सोशल मीडियाचा अतिरेकी वापर तुम्हालाच घातक
ठरू शकतो .


बुधवार, २३ जानेवारी, २०१९

रूक्ष  साऱ्या  आकांक्षा
    एकदा अशाच समाजाने
    वाळीत टाकलेल्या स्त्री
    सोबत भेट झाली...
    कंबरेला खोचलेला पदर तिचा
    गालाला लावलेली लाली
    काजळ माखलेल्या डोळ्यात तिच्या
    उद्याची कितीतरी स्वप्ने रंगवलेली होती पण ,
    स्वप्ने ती जळून राख झाली...
    लाल गर्द लिपिस्टिक लावलेल्या
    कापऱ्या ओठांनी काळीज चिरून
    घेणारे शब्द तिचे बाहेर पडत होते...
    रोज भोगणारे भोगतात म्हणे
    नश्वर देह्याची ह्या चव ;
    कधी उंचभ्रू  नवाजलेली
    शोकीन येतात वस्तीत आमच्या
    अन् पैशाच्या बाजारात चढवतात
    बोहल्यावर आम्हाला ...
    तर कधी सौदा करून देहाचा देह 
    आमचा विक्रीला काढतात .... 
    अंधारलेल्या काळोखापरी जीवन
     झाले भकास ताई तुम्ही सांगा म्हणे ,
     आमचा धंदा झाला बंद तर तरूणी
     स्त्रीया राहिल का सुरक्षित ह्या देशात ???
     की वासनेने बरबटलेले हे जनावर
     करेल तिचा घात जीव घुटमळतो
     म्हणे ह्या चार भितीच्या आत ...
     करा आमच्यासाठी काहीबायी
     नाहीतर तुमचा हा स्त्री जन्म असा
     फुकट वाया जायी...
     मला जागा ठेवणारा तिचा श्वासही
     वेशा वस्तीसाठी क्षणक्षण झुरतो अन्
     लढतो कुठल्याही ऋतुमानात
     तिला हवा तसा दिवस यावा म्हणून ....
     पण, वासनेचा अंत होतो कुठे ??
     पेटत्या अग्नी ज्वाले सोबत वासना ही
     जळली तर ....
     तुला सांगते ,
     भिजल्या पापण्यांनी पाहू स्त्रीला स्वतंत्र्य
     मिळाल्याचे सोहळे ....
     रूक्ष साऱ्या  आकांक्षा अन् भेदणाऱ्या 
     कर्णाला आर्त आजर्वी हाकांच्या मागण्या ...       

मी लिहिलेली ई कादंबरी

मी लिहिलेली ई कादंबरी
मृगजळ

रिव्होल्यूशन 2020

रिव्होल्यूशन 2020
रिव्होल्यूशन 2020

तुकोबांची अभंगवाणी

भेट द्या मराठी प्रतिलिपीला

भेट द्या मराठी प्रतिलिपीला
मराठी प्रतिलिपी

पुस्तकांवर क्लिक करा

पुस्तकांवर क्लिक करा

ई-साहित्य प्रतिष्ठान

ई-साहित्य प्रतिष्ठान
वाचा हजारभर पुस्तके

बोलती पुस्तके ऐका

कोल्हाट्याचं पोरं

कोल्हाट्याचं पोरं
लेखक - किशोर काळे

कन्यादिन विशेषांक

कन्यादिन विशेषांक
कविताविश्व

नेतृत्वाची गुरुकिल्ली

नेतृत्वाची गुरुकिल्ली
लेखक - रॉबिन शर्मा

अर्थाच्या शोधात

एकूण पृष्ठदृश्ये

हा ब्लॉग शोधा

नेतभेटवर वाचा

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

मी इंडियन ब्लॉगरवर आहे

आता वाचक येत आहेत